कोल्हापूर जिल्हात सोमवार पासून कडकडीत लॉकडाउन - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2020

कोल्हापूर जिल्हात सोमवार पासून कडकडीत लॉकडाउनकोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात,  दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होत होता. दररोज कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. याचाच विचार करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी अखेर शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. सोमवार(दि.20 )रोजी पासून सात दिवसांचे लॉकडाउन राहणार आहे. यामध्ये दूध व औषधे वगळता संपूर्ण दुकानें बंद राहतील.
शुक्रवारी सकाळी जिल्हातील सर्व लोकप्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरेन्स द्यावरे बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. गेले काही दिवस कोल्हापूर जिल्हात कोरोनाविषयी कोणत्याही पद्धतीचे गांभीर्य न्हवते. सोसिअल डिस्टन्स, मास्क न वापरणे, ट्रिपल सीट मोकाट फिरणे अश्या गोष्टींन मुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. आज एका दिवसात आतापर्यंत विक्रमी 257 रुग्णाची वाढ झाली. याचाच विचार करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवार पासून आठवडा भर कोल्हापूर जिल्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई व जी. प. सीइओ अमन मित्तल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment