चंदगड तालुक्यात कोरोनाचा कहर,एकाच दिवसात सापडले 36 नवे रुग्ण - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2020

चंदगड तालुक्यात कोरोनाचा कहर,एकाच दिवसात सापडले 36 नवे रुग्ण

चंदगड / प्रतिनिधी
आज दुपारच्या अहवालानुसार  चंदगड तालुक्यात एकूण 36 नवे रुग्ण सापडले, त्यामध्ये कुर्तनवाडी 1 विंजने 1 करंजगाव 1 धुमडेवाडी 1वाघूत्री 1इनाम म्हाळुंगे 1नरेवाडी 1सुपे 1 हलकर्णी 2 कानूर बुद्रुक 2करेकुंडी 2आसगाव  1माडवळे 1कानडी 2नागणवाडी 1अडुरे - 1 शिरोली 1पोवाचीवाडी 1बगिलगे 1होसुर 1लकीकटे 9 दाटे 1 असे एकाच दिवसात तब्बल  36 रुग्ण सापडल्यामुळे चंदगड तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चंदगड तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या ही आतापर्यंतची कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णाच्या संख्येच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आहे.तरी देखील चंदगडकरांचा वावर अगदी बिन्दास्त चालू असलेला दिसून येतोय. सोसिअल डिस्टन्सचा वापर न करता गावोगावी दुकानात, दूध डेअरीत, स्टँड, देवळे याठिकाणी गर्दी करून महिफिली रंगताना दिसताहेत. 144कलम लागू असताना देखील बाईक वरून अगदी तीन तीन जण मास्कचा वापर न करता अगदी मोकाट हिंडताहेत. गर्दीच्या ठिकाणी मला काय होनार आहे असे म्हणतं  मास्कचा वापर न करता वावर सुरु आहे.दरम्यान चंदगड तालुक्यातील रोजची आकडेवारी बगता समूह संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.काल पूर्ण दिवसात 28 रुग्ण सापडले होते. याचाच विचार करत मा. जिल्ह्याअधिकारी  याच्या आदेशानुसार व मा. तहसीलदार याच्या सुचणेनुसार 6  भरारी पथक काल पासून तैनात केलेली आहेत. नियमांचे उलघटन करणाऱ्यावर कडक कारवाही होनार असल्याची माहिती चंदगडचे तहसीलदार विनोद रनवरे यांनी दिली आहे. तर सोमवार पासून संपूर्ण कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतलेला आहे.

No comments:

Post a Comment