विजबिलासंदर्भात वीज वितरण च्या अधिकाऱ्यांशी चर्च्या करताना युवक वर्ग. |
कोवाड / सी एल वृत्तसेवा
लॉकडाऊन काळात गेल्या तीन महिन्यांच्या वीजबिलाने उच्चांक गाठलाय. सामान्य कुटुंबातील लोकांबरोबरच श्रीमंतांनाही विजबिलाचा मोठा फटका बसलाय. चंदगडमध्ये अनेकांना वाढीव वीजबिल आल्याची तक्रार आहे. याचसंदर्भात आज कर्यात भागातील काही तरुणांनी विजबिलाच्या तक्रारी घेऊन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विशाल शिवकुमार लोधी यांची कोवाड येथील वीज वितरण कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतली. सरासरी अंदाजापेक्षा अधिक बिल आल्याने सामान्य लोकांना वीजबिलाचा फटका बसला असल्याची तक्रार त्यांच्यासमोर मांडण्यात आली. आलेले वीजबिल हे तांत्रिकदृष्टया बरोबर असल्याचे लोधी यांनी पटवून दिले असले तरी सरकारने या बाबतीत लोकांना सूट देणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याने लोकांमध्ये विजबिलावरून अनेक चर्चा सुरू आहेत.यावेळी विवेक मनगुतकर,नरसिंग बाचुळकर,विनोद कांबळे,कृष्णा सोनारवाडकर,संतोष पाटील,विशाल तरवाळ,गजाभाऊ पाटील,भाऊ जोशीलकर, रवी मणगुतकर,प्रदीप गवंडी,गजानन ओऊळकर,अशोक हन्नूरकर, गजानन राजगोळकर,दशरथ आतवाडकर यांनी आज ही भेट घेऊन महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा केली.लॉकडाऊन च्या काळात विजेचा वापर जास्त झाल्यामुळे वीजबिले ही ज्यादा आल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले पण ग्रामीण भागातील शेतकरी हा लॉकडाऊन च्या काळात देखील दिवसभर शेतीतील कामामध्ये व्यस्त असल्याचे यावेळी स्पष्टीकरण देण्यात आले.शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये आलेली वीजबिल ही अधिक आल्याने अनेकांना फटका बसला असून यातून सरकार काही सूट देणार का याबाबत आशा व्यक्त केली जातीय.त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढून संबधीत वाढीव विजबिलासंदर्भात योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे.
No comments:
Post a Comment