कर्यात भागात भात रोप लावणी अंतिम टप्प्यात - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2020

कर्यात भागात भात रोप लावणी अंतिम टप्प्यात

कर्यात भागातील कालकुंद्री येथे रोप लावणीत व्यस्त असलेली शेतकरी कुटुंबे.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
       चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात भात रोप लावणी अंतिम टप्प्यात आली आहे. 
या भागातील कुदनुर, कालकुंद्री, कागणी, कोवाड, किणी, निटूर, घुलेवाडी आधी पंचवीस-तीस गावांत काळ्या व चिकन जमिनीमुळे चिखल करणे जिकिरीचे काम असते. त्यामुळे इकडे विशेषता कुरीच्या सहाय्याने धुळवाफ व कोरवाफ पेरणी केली जाते. तथापि अचानक पडलेल्या मोठ्या पावसामुळे पेरणी करण्याची संधी बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून चिखलातील भात रोप लावणी सुरू आहे. सुरुवातीला सत्तर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. उर्वरित भात लावणीची धांदल सुरू आहे. चिखल करण्यासाठी बैलजोड्यांची कमतरता असल्यामुळे यंत्रांचा आधार घेतला जात आहे. तथापि बरीच रोटर यंत्रे चिकट चिखलात अडकून नादुरुस्त होताना दिसत आहेत. सध्याचा पाऊस रोपलावणीसह उगवण झालेले भात, बटाटे, भुईमूग आदी पिकांना उपयुक्त असल्याने बळीराजा सुखावला आहे.

No comments:

Post a Comment