डाॅ विनायक भोसलॆ याच्या वतीने महिपालगड येथे आयर्वेदीक गोळ्याचे वाटप. |
महिपालगङ परिसरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्याचे महिपालगङ येथे 325 कुटुंबातील व्यक्तीना वितरण करण्यात आले. वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रा. रमेश भोसलॆ होते हिरामणी तुपारे अध्यक्ष म गांधी तंटामुक्त समिती व तुकाराम भरमु मोरे माजी सरपंच याच्या हस्ते औषध वितरण करण्यात आले सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून सरपंच प्रा .रमेश भोसलॆ यांचे चिरंजीव डाॅक्टर विनायक भोसलॆ बेळगाव याच्या मार्फत मोफत औषध वाटप केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार हिरामणी तुपारे यांनी मानले आशा सेविका सौ. शिला भोसलॆ व अंगणवाडी सेविका सौ .शितल कदम यांनी प्रतेक कुटुंबाच्या घरी जाऊन गोळ्याचे वितरण केले . कार्यक्रमाला आरोग्य सेविका सौ. शुभांगी पाटील, पोलिस पाटील ,सौ.कोमल सावंत. ग्रा सदस्य, मोनेश्री भोसलॆ, मनोहर सावंत, सौ.रेणुका केसरकर ,सौ.रेणुका सुतार व ,सुभाष बाबाजी भोसलॆ, मावरुती केसरकर ,वैजनाथ कदम ,तुकाराम तुपारे व प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment