कडलगे येथील प्रथमेश कुट्रे ने दहावीच्या परीक्षेत मिळवले 90.2% गुण - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2020

कडलगे येथील प्रथमेश कुट्रे ने दहावीच्या परीक्षेत मिळवले 90.2% गुण

प्रथमेश राणबा कुट्रे
चंदगड / प्रतिनिधी
   कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील प्रथमेश राणबा कुट्रे याने दहावीच्या सीबीएसई परीक्षेत 90.2% मार्क  मिळवून उज्वल यश संपादन केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
    प्रथमेश सद्या हाय व्हीजन इंटरनॅशनल स्कूल तळेगाव -पुणे येथे शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या प्रथमेश यांच्या या उल्लेखनीय दैदिप्यमान यशाबद्दल चंदगड आजरा गडहिंग्जलसह विद्यानगरी पुणे येथे अभिनंदन होत आहे. प्रथमेश याला वर्गशिक्षिका सौ. रचना,  सौ.आदिती व  लियर कार्पोरेेशन चाकण येथे कार्यरत असलेले वडील केमिकल इंजिनियर राणबा ( यल्लापा ) कुट्रे  यांच्यासह प्रशालेचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रथमेशचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment