कलिवडे येथील शिक्षकाचे हृदयविकाराने निधन - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2020

कलिवडे येथील शिक्षकाचे हृदयविकाराने निधन

सुभाष रूक्माना देसाई
चंदगड / प्रतिनिधी
कलिवडे ता चंदगड येथील रहिवासी व जंगमहट्टी प्राथमिक शाळेचे अध्यापक सूभाष रूक्माना देसाई (वय वर्षे ४६)यांचे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.
      सकाळी अंघोळ करण्यासाठी सूभाष देसाई हे बाथरूम मध्ये गेले होते, अंघोळ करत असतांनाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा तोल गेल्याने ते भिंतीवर आदळल्याने त्यांच्या मेंदूला जबर मार बसला.प्राथमिक उपचारासाठी त्यांना माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असतानाच वाटेत त्यांच्या मृत्यू झाला, त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी,एक १४वर्षाचा मूलगा असा परिवार आहे .त्यांच्या अकस्मिक मृत्यूने कलिवडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. 
    सुभाष देसाई यांनी कलिवडे येथील धनगरवाड्यावरील वस्ती शाळेत नोकरीला सूरवात केली.नोकरी करत असतांनाच प्रतिकुल परिस्थितीत डी. एड,हि शिक्षण पदवीका मिळवून प्राथमिक शिक्षण विभागाकडे ते जंगमहट्टी शाळेत चार वर्षापूर्वी कायम झाले होते गेल्या चार वर्षांपासून त्यांनी संसाराचा गाडा सुरळीत केला होता. अत्यंत साधा स्वभाव,हसतमुख व्यक्तीमत्व असलेले  सुभाष देसाई यांचा गावातील दुध संस्था, सेवा संस्था,शिक्षण संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे.

No comments:

Post a Comment