तेऊरवाडीतील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी कर्नाटकातील दोघाना अटक, कोवाड पोलिसांची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2020

तेऊरवाडीतील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी कर्नाटकातील दोघाना अटक, कोवाड पोलिसांची कारवाई

तेऊरवाडी ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील अटक केलेल्या आरोपी सोबत कोवाड पोलिस चौकीचे कर्मचारी.

तेऊरवाडी / प्रतिनिधी
     तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील   कल्लाप्पा सतुराम भोगण यांच्या मालकीच्या स्टोन क्रशर वरून चोरून नेलेले दोन ट्रॅक्टर कोवाड पोलिसांनी हस्तगत करून कर्नाटकातील दोन आरोपींना अटक केली आहे. फकिराप्पा गदग्याप्पा घोरनकोळ ( वय वर्षे  -३३ )  रा . शिंगळापूर टके पोष्ट लोळसुर ता .गोकाक जि. बेळगाव व बालाप्पा यमनाप्या वडर ( वय वर्षे २६ ) रा .केसापूर पो. आलूर , ता . मुद्देबिहाळ जि. विजापूर अशी अटक केलेल्या  संशयीत आरोपींची नावे आहेत  .
         कोवाड पोलीसातून मिळालेली आधिक माहिती अशी ,तेऊरवाडीच्या हद्दीत जि.प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या मालकीचा स्टोन क्रशर आहे  या ठिकाणी असलेला महिंद्रा कंपनिचा ब्लास्टींग ट्रॅक्टर ,अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये , स्वराज कंपनिचा ३ लाख ३५ हजार रुपयांचा  ट्रॉलीसह ट्रॅक्टर दि .२३ जुन रोजी रात्री चोरीला गेल्याची फिर्याद लक्ष्मण रघूनाथ सुर्वे यानी कोवाड पोलिसात दिली होती . त्यानूसार कोवाड पोलिसानी याच क्रशरवर दोन वर्षांपूर्वी काम केलेल्या कर्नाटकातील कामगारावर लक्ष केंद्रीत करून  कर्नाटकात जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ट्रॅक्टर सह फकिराप्पा गदग्याप्पा घोरनकोळ व बालाप्पा यमनाप्या वडर हे दोघेजण कर्नाटकातील गोकाक ,विजापूर कडे गेलाचा सुगावा लागला.त्याआधारे  या दोन संशयीत आरोपीना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आली आहेत.आठवड्याभरात चोरीचा छडा  लावल्याने कोवाड पोलिसांचे कौतुक होत आहे .या घटनेचा तपास सहा फौजदार एच .एस. नाईक करत आहेत.


No comments:

Post a Comment