तुर्केवाडी (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाची साखळी दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत दौलत कारखान्यातील दहा हून अधिक कर्मचारी पाॅझीटीव्ह असल्याने कोरोना कनेक्शन आता तुर्केवाडी येथील अचल काजू फॅक्टरीपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या तांबुळवाडी गावची कोरोना पॉझिटिव्ह महिला ही अचल फॅक्टरीमध्ये कामाला असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात गुरुवारी तुर्केवाडी ग्राम दक्षता समितीने तात्काळ बैठक घेत फॅक्टरी प्रशासनाला प्रतिबंधात्मक सूचना दिल्या आहेत. यावेळी गावकामगर पोलीस पाटील तथा कोरोना दक्षता समितीच्या सचिव सौ. माधुरी कांबळे, उपसरपंच अरुण पवार, सदस्य भरमाणा अडकुरकर, रमेश पाटील, भरमाणा गावडे, अमृत मोरे, चेतन बांदिवडेकर आदी उपस्थित होते.
कोरोना दक्षता समितीच्या वतीने फॅक्टरीची पाहणी करून गावच्या सुरक्षिततेच्या वतीने प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आल्या. फॅक्टरीतील कोरोना बाधित महिला काम करत असलेल्या विभागातील तिच्या संपर्कातील सर्वांची नावे आरोग्य विभागाला पाठवण्यात येत असून हा विभाग सील करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित महिलेच्या संपर्कातील व्यक्तीची यादी त्वरित समितीला द्या, तसेच गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अचल काजू फॅक्टरी पुढील पाच दिवसासाठी बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे माहीत गावकामगार पोलीस पाटील सौ. माधुरी कांबळे यांनी दिली. तुर्केवाडी गावातील स्थानिक महिला फॅक्टरीत मोठ्या संख्येने कामाला असून त्यांनी सतर्क राहून स्वतःची काळजी घेण्याची आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
- दौलत कानेक्शनने संसर्गाचा वाढ
तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेले तांबुळवाडी गावचे दौलत कनेक्शन आता तालुक्यातील इतर ठिकाणी पसरू लागले आहे. बुधवारी आलेल्या कोरोना रिपोर्टमध्ये पॉझिटीव्ह आलेल्या तांबुळवाडीच्या महिलेचा संपर्क तुर्केवाडी येथील अचल फॅक्टरीशी असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर ही महिला त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधित झाल्याची शक्यता आहे. आणि हे कनेक्शन दौलत कारखान्यातील संसर्गाशी निगडित आहे. त्यामुळे ही साखळी तोडणे महत्वाचे झाले आहे.
दरम्यान आज तहसिलदार विनोद रणवरे यांनी दौलत कार्यस्थळी भेट देऊन कारखान्याचे कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिले.
No comments:
Post a Comment