चंदगड तालुक्याचा बारावीचा निकाल 96.61 टक्के, पाटणे व हेरे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2020

चंदगड तालुक्याचा बारावीचा निकाल 96.61 टक्के, पाटणे व हेरे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के


सी. एल. वृत्तेसवा, चंदगड
      चंदगड तालुक्यातील यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी 15 कनिष्ठ महाविद्यालयामधून 2509 विद्यार्थ्यी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 2424 विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालातील 15 कनिष्ठ महाविद्यालयांचा सरासरी  96.61 टक्के निकाल लागला. चंदगड तालुक्यामध्येही पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्याचे निकालावरुन दिसून येते. तालुक्यातील छत्रपती शहाजी ज्युनि. कॉलेज पाटणे-चंदगड व सह्याद्री विद्यालय व ज्युनि. कॉलेज हेरे या दोन्ही ज्युनि. कॉलेजचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
     परिक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला.  निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेट कॅफेसंगणक प्रशिक्षण केंद्रेमहा ई-सेवा केंद्रावर नेहमी होणारी गर्दी यावेळी मात्र दिसली नाही. कारण मोबाईलच्या 4 जी सेवेमुळे व अनलिमिटेड पॅकमुळे प्रत्येकाने आपापल्या मोबाईलवरच निकाल पाहणे पसंद केले. सध्या स्मार्टफोनचे युग असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरच निकाल पाहणे पसंद केले.  
     दि न्यु इंग्लिश स्कुल, चंदगड (98.60), गुरुवर्य एम. बी. तुपारे ज्युनि. कॉलेज कार्वे (98.04), श्रीमान वाय. पी. देसाई, कोवाड (93.78), गुरुवर्य जी. व्ही. पाटील ज्युनि. कॉलेज हलकर्णी (99.10), रामलिंग हायस्कुल व ज्युनि. कॉलेज तुडये (95.00), सरस्वती विद्यालय व ज्युनि. कॉलेज कालकुंद्री (93.91), एस. एस. टी. वाघमारे ज्युनि. कॉलेज ढोलगरवाडी (90.62), धनंजय विद्यालय व ज्युनि. कॉलेज नागनवाडी (97.67), बागिलगे डुक्करवाडी विद्यालय व ज्युनि. कॉलेज बागिलगे (92.68), श्री. शिवशक्ती हायस्कुल व ज्युनि. कॉलेज अडकूर (83.33), छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज माणगाव (72.72), सिध्देश्वर हायस्कूल व ज्युनि. कॉलेज कुदनुर (77.27), श्री. रवळनाथ ज्युनि. कॉलेज चंदगड (99.02), राजश्री शाहु ज्युनि. कॉलेज शिनोळी बुद्रुक (91.66).

No comments:

Post a Comment