चंदगड तालुक्‍यात दमदार पर्जन्यवृष्टी ला सुरुवात; आज अखेर ४६८२ मिलिमीटर पावसाची नोंद - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2020

चंदगड तालुक्‍यात दमदार पर्जन्यवृष्टी ला सुरुवात; आज अखेर ४६८२ मिलिमीटर पावसाची नोंद


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा  
         चंदगड तालुक्यात आज सकाळपासून दमदार पर्जन्यवृष्टी ला सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत असलेला बळीराजा या पावसामुळे पुन्हा आनंदित झाला आहे. सध्या सुरू असलेला पाऊस भात रोप लागण तसेच  भात, बटाटे, भुईमूग, सोयाबीन आदी सर्वच पिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. 
     १ जून पासून आज दि. १६ पर्यंत तालुक्यात एकूण ४६८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी ७८० मी मी एवढी आहे. तालुक्यात विभाग निहाय पडलेला आजपर्यंतचा एकूण पाऊस व कंसात गेल्या चोवीस तासातील पाऊस मिलिमीटरमध्ये चंदगड ९७२  (१३), नागणवाडी ७९४ (९), माणगाव २२१ (३), कोवाड ४०१ (७), तुर्केवाडी  ७७२ (८), हेरे १५२२ (११) मीमी पावसाची नोंद झाली असून गेल्या चोवीस तासात तालुक्यात एकूण ५१ मीमी तर सरासरी ८.५ मिमी पावसाची नोंद झाली. तुलनेत आकडेवारी कमी असली तरी  आज सकाळपासून तालुक्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे नदी व विविध धरणांच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.
   दरम्यान जंगमहट्टी येथील गोविंद गावडे यांच्या घराची भिंत कोसळून त्यांचे २० हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले  आहे.

No comments:

Post a Comment