बोजूर्डी येथे महिला दक्षता समिती सदस्यांनी शिवीगाळ करणाऱ्या महिलेवर गून्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2020

बोजूर्डी येथे महिला दक्षता समिती सदस्यांनी शिवीगाळ करणाऱ्या महिलेवर गून्हा दाखल

अडकूर / प्रतिनिधी
     अलगीकरण कक्षात न राहता मनमानी पद्धतीने वागणाऱ्या बोजूर्डी ता चंदगड येथील  महिलेने महिला दक्षता समिती सदस्यांनाच शिवीगाळ करणार्या महिलेवर चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विठाबाई विष्णू सूतार असे या महिलेचे नाव आहे 
    अडकुर मधील कोरोना बाधित व्यक्तीशी विठाबाई  सुतार या महिलेचा सम्पर्क होता . त्यामुळे खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांना विलगीकरनातं ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.स्थानिक दक्षता समितीने 26 जून ते 10 जुलै पर्यंत संस्थात्मक अलगीकरन केले व 24 तारखे पर्यंत होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले . मात्र सदर महिला नियमांचे उल्लंघन करून फिरत होती. याबाबत दक्षता समितीने विचारणा केली असतां मला कोण अडवते ते बघतोच असे म्हणून तिने शिवीगाळ केली .याबाबत महिला दक्षता समिती सदस्यांनी चंदगड पोलिसांत तक्रार दिली असून  पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment