लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिले माफ करा अन्यथा तीव्र आंदोलन, कोणी दिला इशारा? - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2020

लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिले माफ करा अन्यथा तीव्र आंदोलन, कोणी दिला इशारा?

महावितरणच्या तुर्केवाडी शाखेवर ग्रामस्थांनी केली वीजबिलांची होळी
सहाय्यक अभियंता पद तीन महिन्यापासून रिक्त असल्याने संताप व्यक्त
वीज बिलांची होळी करताना ग्रामस्थ. 
तुर्केवाडी (प्रतिनिधी) : 
            लॉकडाऊन कालावधीतील वाढीव वीजबिले माफ करा तसेच तुर्केवाडी शाखेच्या सहाय्यक अभियंता पद त्वरीत भरा या मागण्यांसाठी बुधवारी महावितरणच्या तुर्केवाडी शाखेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वीजबिलांची होळी करत महावितरणाच्या कारभाराचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. तर या मागणीचे निवेदन स्विकारायला देखिल अधिकारी नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. गेल्या तीन महिन्यापासून येथील सहाय्यक अभियंता पद रिक्त असून लवकरात लवकर अधिकारी हजर व्हावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
          गेल्या चार महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार बंद आहेत. अनेकांचा रोजगार गेला असून व्यावसाय बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत महावितरणने तीन महिन्यात भरमसाठ वीजबिले दिली गेली आहेत. ही बिले भरण्याची सध्या लोकांची आर्थिक स्थिती नसून सर्व वाढीव वीजबिले माफ करावीत. तसेच तुर्केवाडीमध्ये महावितरणचे सबस्टेशन असून त्याअंतर्गत शिनोळीपासून कोलिक-महाळुंगेपर्यंतची तीसहून अधिक गावे येतात. असे असतांना देखिल याठिकाणी सहाय्यक अभियंता दर्जाचा अधिकारी नियुक्त असूनही हे पद तीन महिन्यापासून रिक्त आहे. इतक्या मोठ्या भागातील शेतकरी, सामान्य नागरिकांना शाखा कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्वरीत अधिकारी हजर करा अशी मागणी राजेंद्र जोतिबा गावडे यांनी केली. यावेळी  संतोष भरमाण्णा चौगुले, आनंदा रामू कदम, रमेश भरमाणा पाटील, प्रकाश सौदागर, मारुती बागीलगेकर, संतोष गाडीवड्डर, अर्जून कांबळे, हनमंत हालगेकर, अनिल बस्सापूरे, प्रसाद भातकांडे, सभान शेख, दिनकर पवार, फारकू शाहू फर्नाडीस आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment