आयटीआयची आजपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2020

आयटीआयची आजपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

कोल्हापूर (प्रतिनिधी)
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया कडून आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश सत्र 2020 साठी ऑनलाईन प्रवेश अर्ज आज दिनांक 1 ऑगस्ट पासून 14 ऑगस्ट पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर माहिती बरोबर असल्याची खात्री करून प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाइन पेमेंट गेटवे च्या माध्यमातून जमा करावे. प्रवेश अर्ज भरलेल्या उमेदवारांनी पुढील सर्व ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांचा पासवर्ड जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. शासकीय आयटीआय येथे प्रवेश मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एकूण एकतीस व्यवसाय असून एक वर्ष मुदतीचे 15 व्यवसाय आहेत. ह्यात बेसिक कॉस्मोलॉजी, सुतारकाम, कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग, असिस्टंट व्हेजिटेबल अंड प्रोसेसिंग, यांत्रिक डिझेल, यांत्रिक कृषीत्र, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, नळकारागीर, सुईंग टेक्नॉलॉजी, पत्रे कारागीर, सोनोग्राफी संधाता, सरफेस अर्णामेंट यांचा समावेश आहे. दोन वर्ष मुदत व्यवसायात आरेखक, स्थापत्य आरेखक, यांत्रिकी, वीजतंत्री, जोडारी, आय सी टी एस एम, यंत्र कारागीर, घर्षक, मेक मशीन टूल मेंटेनन्स, यांत्रिक मोटार गाडी, यांत्रिक प्रशीतन व वातावरण, रंगारी, जनरल टूल अँड डाय मेकर हे सोळा व्यवसाय आहेत. प्रवेशासाठी मुलांना व मुलींना सर्व व्यवसायात तीस टक्के आरक्षण असून मुलींसाठी ब्युटी पार्लर, कर्तन, शिवण, फळ भाज्या टिकवणे हे स्वतंत्र व्यवसाय अभ्यासक्रम आहेत. प्रवेशासाठी एकच अर्ज भरणे आवश्यक आहे. दुबार अर्ज केल्यास उमेदवार प्रवेश प्रक्रियेमध्ये अपात्र ठरवला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांकडे सर्व मूळ प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवेश नाकारला जाईल. अशी माहिती प्राचार्या आर टी मुंडासे यांनी दिली आहे.
 *प्रवेशाचे वेळापत्रक* ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे 1 ते 14 ऑगस्ट.
 पहिल्या फेरीसाठी विकल्प सादर करणे 2 ते 14 ऑगस्ट.
 गुणवत्ता यादी प्रसिद्धी 16 ऑगस्ट. 
हरकती नोंदवणे 16 ते 17 ऑगस्ट .
  पहिली प्रवेश फेरी 21 ते 26 ऑगस्ट. 
दुसरी प्रवेश फेरी 31 ऑगस्ट ते  3 सप्टेंबर.
 तिसरी प्रवेश फेरी 8 ते 11 सप्टेंबर. 
चौथी प्रवेश खरी 16 ते 19 सप्टेंबर. 
जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी नोंदणी 22 सप्टेंबर. 
समुपदेशन फेरी प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही 24 ते 27 सप्टेंबर.

1 comment:

Unknown said...

AddmisAdm form chi link pahije

Post a Comment