कोरोना योध्याचे प्रशस्तीपत्रक स्वीकारताना सी. एल. न्युज चंदगडचे हलकर्णी प्रतिनिधी संतोष सुतार, कोवाड प्रतिनिधी संजय पाटील.
|
गेल्या पाच महिण्यापासून कोरोणाच्या या काळात वृत्तपत्र , सी .एल. न्यूज चॅनेलच्या माध्यमातून कोरोणासंदर्भात वृत्तांकन करणाऱ्या चंदगड लाईव्ह न्यूजच्या तीन पत्रकारांचा अँटी करप्शन फौंन्डेशन ऑफ इंडिया व ह्यूमन राईट इंटर नॅशनल फेडरेशन ऑफ इंडिया यांचेकडून कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये सी. एल. न्यूजचे चंदगड प्रतिनिधी चेतन शेरेगार, हलकर्णी प्रतिनिधी संतोष सुतार व कोवाड प्रतिनिधी संजय पाटील यांचा समावेश आहे.
या अगोदर या पत्रकारांनी महापुराच्या काळात उत्कृष्ठ वार्तांकन केले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून महापूराचे विदारक दृष्य प्रशासनासमोर आणले होते .त्याचबरोबर सद्या कोरोणाच्या काळात कोरोणा योध्याची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे .या सर्व कार्याची दखल घेत आज गडहिंग्लज येथील अँटी करप्शनच्या कार्यालयामध्ये या तीन पत्रकारांचा शोभा कोकितकर, नॅशनल को- ऑर्डीनेशन व सकल मराठा महासंघाच्या महिला जिल्ह्याध्यक्ष आणि गडहिंग्लज तालुका अध्यक्ष व सकल मराठा महासंघाचे गडहिंग्लज शहर प्रमुख संघटक विनायक इंदुलकर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देवून सन्मान करण्यात आला .त्यांच्या या कार्याबद्दल व यशाबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment