अन....त्या कोरोना वर मात करून आलेल्या योध्याचे झाले अनोखे स्वागत - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2020

अन....त्या कोरोना वर मात करून आलेल्या योध्याचे झाले अनोखे स्वागत

            कोरोनावर मात करून आल्यानंतर प्रा.आरोग्य केंद्र,कोवाड मधील कर्मचारी स्वागत करताना
कोवाड / सी एल वृत्तसेवा (संजय पाटील)
       कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात दिवसागणिक कोरोनाबधितांची आकडेवारी वाढत असताना मागील आठवड्यात माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीचा अहवाल पोजिटिव्ह आला होता. कोरोनावर मात करून आलेल्या त्या योध्याचे कोवाड येथील तो रहात असलेल्या घरी पुष्पवृष्टी करून पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
        कोल्ह्यापुर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात वाढत असलेली स्थानिक रुग्णसंख्या प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे.कोरोना चा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन,सरकारी कर्मचारी रात्रनदिवस मेहनत घेत कोरोना योध्याची भूमिका पार पाडत आहेत.परंतु यामधील बरेच कोरोना योध्ये हे कोविड 19 विषाणू ने संक्रमित होत आहेत त्यात 19 जुलैला दुपारी आलेल्या अहवालामध्ये तालूक्यातील माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याचे अहवाल पोजिटिव्ह आला होता.त्याबरोबरच त्याच्या पत्नीचे अहवाल देखील पोजिटिव्ह आले होते.त्यामुळे त्याना उपचारासाठी चंदगड येथील कोरोना कोविड सेंटर ला रेफर करण्यात आले होते. त्यांचा 5 वर्ष्याचा मुलगा सोबत असल्याकारणाने आणि मुलाचे रिपोर्ट नेगटीव्ह असल्यामुळे चंदगड चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर के खोत यांनी त्यांना गडहिंग्लज येथील शेंद्री माळ मध्ये राहण्याची सुविधा असलेकारणाने याठिकाणी पाठविण्यात आले.   त्यानंतर गेले 10 दिवस ते दाम्पत्य गडहिंग्लज तालुक्यात शेंद्रीमाळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह याठिकाणी उपचार घेत होते.
          याठिकाणी त्यांच्यावर उपचार करून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आले असून ते राहात असलेल्या कोवाड येथील घरी आल्यानंतर त्यांचे याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र,कोवाड येथील कर्मचाऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसन्न चौगुले,औषध निर्माता भरत पाटील,प्रयोग शाळा तंत्रज्ञ नरेंद्र रजपूत,आरोग्य सहायक नारायण घोडे,गजानन चव्हाण,शैलेश वाघमारे,आरोग्य सहायिका रंजना साळोखे,परिचर सुनील गायकवाड,हनुमंत लेंभे,आरोग्य सेविका सुरेखा पाटील,संजीवनी पाटील,आशा वर्कर सुनीता पाटील,नंदिनी पाटील आणि शीतल जाधव उपस्थित होते.
        आमच्या प्रतिनिधींनी संबंधित कर्मचाऱ्याशी सवांद साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले कि,लोकांनी कोरोना संबधी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसून जरी रिपोर्ट पोजिटिव्ह आला असला तरी उपचाराअंती पूर्णपणे बरा होतो.पण कोविड 19 पासून बचाव करण्यासाठी सर्व लोकांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे हे गरजेचं आहे.त्यासाठी प्रत्येकाने मास्क चा वापर करणे,सोशल डिस्टनसिंग चे पालन करून गर्दीमध्ये जाण्याचे टाळणे,अत्यावश्यक बाहेर न फिरता आपली सुरक्षितता आपण बाळगणे, वारंवार हात सॅनिटाईझर किंव्हा साबणाने धुत राहणे इ.

No comments:

Post a Comment