मन्नीकेरीचे जवान फकिरा गुडाजी यांचे नाशिक येथे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2020

मन्नीकेरीचे जवान फकिरा गुडाजी यांचे नाशिक येथे निधन

फकिरा शट्टू गुडाजी
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
      कुदनुर पासून जवळ असणाऱ्या मन्निकेरी (ता. बेळगाव) येथील सैन्यदलाचे जवान नायक फकिरा शट्टू गुडाजी (वय 35) यांचे नाशिक येथे गुरुवारी सेवेत असताना हृदयविकाराने  निधन झाले. या घटनेने मन्नीकेरी गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. नाशिक येथील आर्मी सेंटरमध्ये ते कार्यरत असताना त्यांचे निधन झाले. दोन दिवसानंतर त्यांच्या पार्थिववर मन्नीकेरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांची पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा  मन्निकेरेमध्ये व 10 वी पर्यंतचे शिक्षण हंदीगनूर मध्ये झाले. मन्नीकेरी येथील माजी ग्राम पंचायत सदस्य बाळाप्पा गुडाजी यांचे ते भाऊ तर बेकिनकेरे येथील एसडीएमसी अद्यक्ष मल्लाप्पा गावडे यांचे ते मेहुणे होते.


No comments:

Post a Comment