जक्कनहट्टीच्या दांपत्यावर दुर्दैवी प्रसंग, पत्नी वियोगाच्या काही तासातच माजी उपमहापौरांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2020

जक्कनहट्टीच्या दांपत्यावर दुर्दैवी प्रसंग, पत्नी वियोगाच्या काही तासातच माजी उपमहापौरांचे निधन

कल्लापा प्रधान                                          पार्वती प्रधान
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
         मुळचे जक्कनहट्टी (ता. चंदगड) व बेळगाव महापालिकेचे माजी उपमहापौर कल्लापा मुरारजी प्रधान (वय 83 रा. शिवाजीनगर बेळगाव)
 यांचे पत्नीच्या रक्षा विसर्जनाला जाताना हृदय विकाराने निधन झाले.  पत्नी निधन झालेल्या 24 तासांच्या आत वृद्ध पतीचे निधन झाल्याची घटना बेळगाव शहरातील शिवाजीनगर येथे गुरुवार दी. १३ रोजी घडली. सदर दांपत्य हे मुळचे जक्कनहट्टी (त. चंदगड) येथील असून सध्या बेळगाव येथेच वास्तव्यास आहे. या घटनेने जक्कनहट्टी ग्रामस्थ शोकाकुल झाले आहेत.
            कल्लापा मुरारजी प्रधान (वय 83 रा. शिवाजीनगर बेळगाव) असे त्यांचे नाव आहे. कल्लाप्पा प्रधान यांच्या पत्नी पार्वती (वय 70) यांचे बुधवारी सकाळी 10 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांची रक्षा विसर्जन करण्यासाठी कल्लाप्पा प्रधान हे सदाशिवनगर स्मशानभूमी कडे जात होते त्यावेळी स्मशानभूमीच्या गेटवरच त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला व ते खाली कोसळले त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोवर त्यांची प्राणज्योत मावळली होती.
         केवळ 24 तासांतच या दोन्ही वृद्ध पती पत्नीचे निधन झाल्याने शिवाजीनगर भागांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कल्लाप्पा प्रधान यांनी बेळगाव मनपात उपमहापौर पद भूषविले होते ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे जेष्ठ कट्टर कार्यकर्ते होते त्यांनी अनेक सीमा लढ्यात चळवळीत सहभाग घेतला होता. शिवाजी नगर भागातील गणेश मंगल कार्याच्या उभारणीसाठी मोठं योगदान होत.1987 साली ग्यानी झेल सिंह बेळगावला आले होते त्यांनी प्रधान यांनी त्यांचं स्वागत केलं. माजी नगरसेवक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते होते त्यांनी दोन वेळा बेळगाव मनपाचे नगरसेवक पद भूषवले होते. प्रधान यांच्या पश्चात्य मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.


No comments:

Post a Comment