कुदनुरच्या तरुणाचा शोध सुरू, दुंडगे पुलावरून नदीत पडल्याचा संशय - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2020

कुदनुरच्या तरुणाचा शोध सुरू, दुंडगे पुलावरून नदीत पडल्याचा संशय

अनिल यशवंत बामणे
कागणी : सी एल वृत्तसेवा
       कुदनूर (ता. चंदगड) येथील अनिल यशवंत बामणे (वय 32) हा तरुण गोवा येथून बुधवारी रात्री कोवाडहून कुदनुरला जात असताना दुडंगे पुलावरून पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
रेस्कू टीमची बोट शोध घेताना

       कोवाड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून सीडीआर द्वारे अनिलचे लोकेशन कुदनुर परिसरच दाखवत आहे. अनिल हा गत आठ वर्षापासून गोवा येथे केमिकल इंजिनिअर म्हणून एका खाजगी कंपनीत नोकरी करत आहे. बुधवार दिनांक 12 रोजी रात्री गोवा येथून अनिल येत होता येत असताना दोन वेळा घरी कॉल करून घरी येत असल्याचे सांगितले, मात्र दुंडगे येथून पुढे आल्यानंतर पुलावरून त्याचा ताम्रपर्णी नदीत दुचाकीसह पडून मृत्यू झाल्याचा संशय येत आहे. रात्री उशिरा अनिल घरी न परतल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू केली आहे. गुरुवारी दी. १३ रोजी सकाळी पोलिसांनी या ठिकाणची पाहणी केली आहे यानंतर तहसीलदार विनोद रणावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथ रेस्कु फोर्स कंपनीच्या  टीम ने ताम्रपर्णी नदी पात्रात शोध मोहीम सुरू केली आहे. अभिजित चव्हाण, कृष्णा भिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम प्रमुख श्रीपाद सामंत, पांडुरंग माईनकर, विशाल परब, अजय सातार्डेकर, रामदास पाटील संतोष धुरी, युवराज नौकुडकर, शुभम पाटील, गजानन मोहणगेकर यांची टीम शोध घेत आहे.  गुरुवारी रात्री सात वाजेपर्यंत या टीमने शोध घेतला त्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी सकाळी अकरानंतर पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात  येणार असल्याचे श्रीपाद सामंत यांनी सांगितले. गुरुवारी यांत्रिक बोटीने भोवरा तयार करून मृतदेह वरती येतोय का ते पाहण्यात आले मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. सदर ठिकाणी ताम्रपर्णी नदीत वीस फूट उंचीचा पाण्याचा प्रवाह असल्याने बोटीलाही अडचण निर्माण होत आहे. कुद्नुरचे चंद्रकांत कांबळे, पोलीस पाटील लोहार, पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार हनमंत नाईक, संतोष साबळे, अमर सायेकर, शिंदे आदी परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment