पाटणे फाटा येथे मोबाईल दूकानात चोरी, दोन लाखांचा माल लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2020

पाटणे फाटा येथे मोबाईल दूकानात चोरी, दोन लाखांचा माल लंपास


चोरट्यांनी याच दुकानात चोरी केली. 

चंदगड / प्रतिनिधी
       पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील साईराज मोबाईल शाॅपी व ईलेट्राॅनिक्स हे दूकान काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून दूकानातील नवे, जूने मोबाईल,ईलेट्राॅनिक्स साहित्य व रोख पंधरा हजार रोख अशा दोन लाख रूपयांचा माल लंपास केला. 
       याबाबत माहिती अशी कि काल मध्यरात्री चोरट्यांनी लोखंडी कटावनीने दुकानाचे शटर उचकटून दूकानात प्रवेश केला.दूकानात रिपेअरी साठी आलेले  50/60 मोबाईल, नवीन मोबाईल,  इलेक्ट्रिक साहित्य ,रोख पंधरा हजार अशा एकूण दोन लाख रुपयांचा माल लंपास केला. या बाबतची वर्दी  दुकान मालक परसू सदावर यानी चंदगड पोलिसांत दिली आहे. हवालदार डी एन पाटील अधिक तपास करत आहेत. 

No comments:

Post a Comment