सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १२ (बिनविषारी साप) कुकरी (oligodon arnensis) - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १२ (बिनविषारी साप) कुकरी (oligodon arnensis)

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १२ (बिनविषारी साप) कुकरी (oligodon arnensis)
कुकरी (oligodon arnensis)
         कोल्युब्रिडी सर्पकुलातील एकूण ४० पैकी सुमारे १३ जाती भारतातील आढळतात. या १३ पैकी काही जाती भारतात सर्वत्र तर काही ठराविक भागांतच दिसून येतात.
       या बिनविषारी सापांची सरासरी लांबी अर्धा मीटर असते. इतर सापांच्या मानाने यांना कमी दात असतात. वरच्या जबड्यातील मागचे काही दात गुरख्यांच्या कुकरीच्या आकाराचे असल्यामुळे यांना ‘कुकरी’ साप म्हटले जाते. हे चपळ असून भित्रे नसतात. सरडे, पाली व त्यांची अंडी, किटक हे यांचे खाद्य आहे.
      भारतात सगळीकडे आढळणारी सामान्य जात ऑलिगोडॉन आर्नेन्सिस  ही आहे. ही महाराष्ट्रात सर्वत्र सापडते. शरीर बदामी तपकिरी असून त्यावर शेपटीच्या टोकापर्यंत २० ते ६० काळे आडवे पट्टे असतात. पोट पांढरे असते. डोक्यावर ^ (उलट्या इंग्रजी व्ही)  आकाराच्या लागोपाठ तीन खुणा असतात. म्हणून या सापाला ‘त्रिशर’ सुध्दा म्हणतात.
         हा नेहमी आढळणारा साप असला तरी पावसाळ्यात अधिक दिसतो. घरांच्या आसपास तो आढळतो व दिवसा हिंडतो.  सामान्यतः सपाट प्रदेशात असला तरी   उंच ठिकाणीही आढळतो. याला डिवचल्यावर चिडून तो आपले सगळे शरीर खूप फुगवतो. कुकरी सापाची मादी अंडी घालते.


सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  मा. तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

*शब्दांकन :- श्रीकांत वै. पाटील,* कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment