मांडेदूर्ग येथील अपघातात दोघांचा मृत्यू, वाचा कोठे घडला अपघात - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2020

मांडेदूर्ग येथील अपघातात दोघांचा मृत्यू, वाचा कोठे घडला अपघात

सुनिल पाटील                                    जोतिबा पवार 
चंदगड / प्रतिनिधी
          मांडेदुर्ग-ढोलगरवाडी दरम्यान मंगळवार दि.४ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता दोन दुचाकीस्वारांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन युवक गंभीर जखमी झाले होते. यापैकी कडलगे खु. येथील सुनिल शिवाजी पाटील ( वय २५ ) या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर मांडेदुर्ग येथील जोतिबा राजेश पवार (वय २२) हा गंभीर जखमी झाला असून त्याला बेळगांव येथील एका खासगी रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचारासाठी  दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना रात्री जोतिबा याचा मृत्यू झाला. 
        कडलगे वरून ढोलगरवाडी फाट्याकडे सूनिल जात होता तर मांडेदूर्ग गावाकडून ढोलगरवाडी येथे औषध आणण्यासाठी जोतिबा दुचाकीवरुन जात होता.मांडेदूर्ग येथील स्वस्त धान्य दुकानाच्या समोर दोन दुचाकीचे समोरासमोर धडक झाली.धडक इतकी जोराची होती की,  जोतिबाच्या गाडीचे इंजिन फुटले तर सूनिल च्या गाडीचा टायर फुटला.या अपघातात  दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. आज दूूूपारी जोतिबावर माांडेदूर्ग येथे अत्यसंंस्कार करण्यात आले. जोतीबा याच्या मागे आई, वडील,आजी भाऊ,बहिण असा तर सुरेश याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. 

No comments:

Post a Comment