कोवाड मधील पुरस्थितीची पाहणी करताना चंदगड पं. समितीचे पदाधिकारी. |
कोवाड /सी एल वृत्तसेवा
मागील वर्षीच्या पुराच्या आठवणी ताज्या असतानाच यावर्षी देखील चंदगड तालुक्यात अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे चंदगड पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी पी.बी.जगदाळे, पंचायत समिती सभापती ऍड अनंत कांबळे, पाणीपूरवठा अधिकारी सावळगी यांनी कोवाड भागाला भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली.
संभाव्य धोका ओळखून चार दिवसामागे ताम्रपर्णी नदीकाठावरील सर्व गावांना प्रांताधिकारी विजया पांगारकर आणि तहसीलदार विनोद रणावरे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. काल गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी यांनी याठिकाणी भेट दिली होती. यावेळी त्यांनी अनावश्यक कारणासाठी बाहेर न पडता घरीच सुरक्षित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. संभाव्य पुरस्थितीचा आराखडा तयार केला असून त्यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले आहेत.ज्या ज्या गावात पुराचे पाणी येऊ शकते अशा गावातील संभाव्य पुरबाधित कुटुंबांची यादी तयार करून त्यांना प्रशासन योग्य ते सहकार्य करणार असल्याचे प्रांताधिकारी पांगारकर यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी जि. प.सदस्य कल्लापा भोगण,बाळू व्हन्याळकर, पी. एस. भोगण, कोवाड बिट चे सर्कल आपासो जिनराळे, तलाठी दीपक कांबळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment