चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी व हलकर्णी येथे शेतकरी कामगार पक्षाचा ७२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जंगमहट्टी येथील माजी आमदार कै. व्हि. बी. पाटील दुध संस्थेत माजी आमदार स्व. व्हि. बी. पाटील व स्व. नेमाणा पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पुजन रविंद्र पाटील, डि. एल तुप्पट, प्रकाश,कोल्हाळ, राजाराम देसाई तसेच पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला तुकाराम भोसले, नंदु पाटील, नामदेव जाधव, तुकाराम नांगुर्डेकर, नारायण कांबळे उपस्थित होते. हलकर्णी येथील फाट्यावर तालुका सरचिटणीस चंद्रकांत बागडी यांच्या हस्ते शेतकरी कामगार पक्षाचा ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी संदिप गवसेकर, भरमु सदावर, संगीता पेडणेकर, सुवर्णा पेडणेकर, गीता पेडणेकर उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment