रविकिरण पेपर मिल समोर कामगारांचे आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2020

रविकिरण पेपर मिल समोर कामगारांचे आंदोलन

हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीतील पेपर मिल समोर आंदोलन करताना कामगार.
चंदगड / प्रतिनिधी
       हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमधील रविकिरण पेपर मिल समोर कामगारांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.सन २०१५-१६ पासूनचा महागाई भत्ता ताबडतोब जमा करा, लॉकडाऊन मधील पीएफ आणि इएसआयचे पैसे ताबडतोब जमा करा. कंपनी कामगारांचे पगार पत्रक व नियुक्ती पत्रक ताबडतोब द्या अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी आंदोलन पुकारले आहे.जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत आम्ही गेट समोरून हलणार नाही अशा कडक शब्दात  कामगार संघटनेचे अध्यक्ष जोतिबा जोशीलकर यांनी पेपर मिलच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.त्यावेळी सर्व कामगार एकजुटीने आंदोलनात सहभागी होते. 

No comments:

Post a Comment