छत्रपती संभाजी महाराजांचे नाव बिडी बंडलवरून तात्काळ हटवावे - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2020

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव बिडी बंडलवरून तात्काळ हटवावे

 बिडी बंडलवरील छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हटविण्याबाबत बजरंग दलाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.
आजरा  / प्रतिनिधी
              बिडी बंडल सारख्या नशिल्या पदार्थांच्या प्रसिद्धीकरिता छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या व्यक्तीचा फोटो व नावाचा वापर करणे ही लांछनास्पद गोष्ट आहे. तात्काळ बिडी बंडलवरून  छत्रपती संभाजी महाराजांचे नाव व फोटो हटवावे नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाच्या वतीने दिला आहे. निवेदन तहसीलदार विकास अहिर व स पो नि बालाजी भांगे याना देण्यात आले आहे निवेदनावर राहुल नेवरेकर,राज मांडेकर,चैतन्य बिडकर,शंतनू पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


No comments:

Post a Comment