कळसगादे परिसरात हत्तीकडून भातपिकाचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2020

कळसगादे परिसरात हत्तीकडून भातपिकाचे नुकसान

संग्रहित छायाचित्र
चंदगड / प्रतिनिधी
       कळसगादे (ता. चंदगड) येथील जंगलात 2 हत्ती व एक पिल्लू असा तीन हत्ती चा कळप वास्तव्यास   5  एकरातील भात पिकाचे नुकसान केले आहे. पोटरीला आलेल्या भाताचे  मोठ्या प्रमाणात नुकसान  केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. 
हत्तींने केलेले भातपिकाचे नुकसान
         दौलत मारुती दळवी,बुधाजी गुंडू दळवी,श्रीपती गुंडू दळवी,दत्तू बुधाजी दळवी, शंकर दत्तू दळवी,मोतीराम शिवाजी दळवी,खेमाजी दत्तू दळवी,पूंडलीक लक्ष्मण दळवी,चंद्रकांत अर्जुन दळवी,प्रभाकर विठोबा दळवी,रवी अर्जुन दळवी, सुनील बाबू दळवी,रमेश विठू पोपकर,प्रकाश निगु दळवी आदी  शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभागा मार्फत पंचनामे करण्यात आले आहेत. 
हत्तींने धुडघुस घालून जमीनदोस्त केलेले भातपिक
परंतु त्याच्या कडून भरपाई पोटी मिळणारी तुटपुंजी रक्कम व झालेले नुकसान यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे  भरपाई मिळावी अशी मागणी  शेतकऱ्यांकडून होत आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी कागदपत्रे गोळा करण्यातच शेतकरी हैराण होत आहेत. वन विभागामार्फत हत्तींना हुसकण्यासाठी सुतळी बॉम्ब,बाण असे प्रयोग करण्यात येतात परंतु हत्ती त्यांना न जुमानता आपला नुकसानीचा कार्यक्रम सूरूच ठेवतात.No comments:

Post a Comment