जंगमहट्टी येथे अस्वलाच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2020

जंगमहट्टी येथे अस्वलाच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी

संग्रहित छायाचित्र
चदगड / प्रतिनिधी
            जंगमहट्टी (ता. चंदगड)  येथील धनगरवाड्यावरील दादू भागोजी शेळके (वय वर्षे ६५) या शेतकऱ्यांवर मादी अस्वल व तिच्या दोन पिल्लांनी हल्ला केल्याने यामध्ये ते गंभीर जखमी झाले. 
         सायंकाळी सहाच्या सुमारास दादू शेळके शेतात काम करीत असताना झुडपातून आलेल्या अस्वलांनी अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या मांडीला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर गडहिंग्लज येथे एका खासगी रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. शेळके यांच्या डाव्या मांडीला मोठी जखम झाली आहे. शरीरावर अन्य पाच ठिकाणी नख्या व दात रुतवल्याचे दिसून येते. जुलै महिन्यात पिळणी येथील उत्तम गावडे या तरुणावरही अस्वलाने केला होता. त्यानंतर महिनाभरातच शेळके यांच्यावर हल्ला केला. या परिसरात अस्वलांचा वावर असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले आहे.No comments:

Post a Comment