![]() |
तेऊरवाडी येथे सर्वेक्षण करताना एम .ए. पाटील व कर्मचारी |
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या माझे कुटुंब - माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील ४२८ कुटुबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. प्राथमिक, माध्यमिक अंगणवाडी शिक्षिका, सेविका, स्वंयसेवक यांच्या मार्फत गावातील ४२८ कुटूंबातील सर्व सदस्यांचे ऑक्सीजन, ताप इतर आजार यांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये एम. ए. पाटील, अनंत पाटील, सुवर्णा भिंगुडे, यमुना भिंगुडे, राजश्री पाटील, अश्विनी गिरी, स्वराज पाटील, रोहित गडकरी यानी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment