हलकर्णी येथे जुगार अड्यावर छापा,साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त, २४ जणांवर कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2020

हलकर्णी येथे जुगार अड्यावर छापा,साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त, २४ जणांवर कारवाई

चंदगड / प्रतिनिधी
      हलकर्णी (ता. चंदगड) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून चंदगड पोलिसांनी ७ लाख ९८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हलकर्णी येथील नाईक वस्तीत मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी २४ जणांविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या छाप्यात रोख रक्कम २ लाख ५०हजार ३८० रुपये, मोबाईल रकम १ लाख ४७ हजार ४००/- रपये, बाकी पत्त्यांचे साहित्य १५ हजार, एक पाढ-या रंगाची महिद्रा बोलेरी रक्कम ३ लाख, एक मारुती सुजुकी कार ३५ हजार असा एकूण ७ लाख ४८ हजार १००/- रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करत २४आरोपींविरिद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अमोल अर्जुन देवकुळे यांनी चंदगड पोलिसांत दाखल केली आहे. हलकर्णी येथील नाईक वस्ती येथे मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वरील सर्व आरोपी तीन पानी जुगार खेळ खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानूसार ही कारवाई करण्यात आली. 
          या प्रकरणी १) सुनिल कल्लाप्पा कोळी (वय २८  रा. कंग्राळी पोर्ट कोळी ता.जि. बेळगाव) २) झाकीर युसुफ नाईक (वय ४५, रा.चंदगड) ३)गराम बाळकृष्ण निलजकर (वय ३५, रा.कंप्राळी) ४) मल्लिकार्जुन तुकाराम कांबळे (वय ३०, शाहुनगर, बेळगाव ता.जि. बेळगाव) ५) पापा शिवानंद यल्लाप्या गडकरी (वय २६, शाहुनगर, बेळगाव) ६) राहुल भैरा राजगोळकर (वय ३२, गांधीनगर, बेळगाव) ७) यल्लाप्या परशराम जाधव (वय ४२, रा.तेनकनहट्टी ता.जि. बेळगाव) ८) बसवंत बाळु पाटील (वय ३५, आंबेवाडी ता.जि.बेळगाव) ९)  सुनिल करताप्पा पाटील (वय ३०, जाफरवाडी पो,कोडोली ता, जि.बेळगाव) १0) पवन सुरेश शिंदे (वय २६, हिंडलगा ११) हणमंत नागाप्पा हुक्ढे (वय ४०, रा.कंग्राळी, बेळगाव १२) तौफीक मोहम्मद मुल्ला (वय ३३, हिंडलगा ता,जि.बेळगाव) १३) सुशांत कामामा क्लोलकर (वय २४, बॉक्साईड रोड ता.जि. बेळगाव १४) गिरीश नागेश खरडेकर (वय २०, रा.कंग्राळी बी.के,ता.जि.बेळगाव १५) नागराज जयवंत हजुरकर (वय २८, कंग्राळी मेन रोड, शाहुनगर ता.जि.बेळगाव १६) विनायक रघुनाय सुतार (वय ३०, हिंडलगा रामदेव गल्ली, ता.जि,वेळगाव १७) शाकीर हुमायुन मुत्ला (वय ३०, रा.हायस्कुल रोड हिंडलगा ता.जि.बेळगाव १८) अखिलेश महादेव भादवणकर (वय २१, रा. महादार रोड, संभाजी गल्ली, बेळगाव ता.जि. बेळगाव १९) अनिस समयलाल पाल (वय २०, रा.स्स.पी.एम रोड ता.जि.बेळगाव २०) किरण शिवाजी बाचीकर (वय ४०, शहापुर ता.जि.बेळगाव २१) सुरेश जगनाथ संकपाळ (वय ५०, रा.लक्ष्मीनगर हिंडलगा रोड बेळगाव २२) मनसुर महमंद पटेल (वय ४५ रा.नविन वसाहत, चंदगड २३) हिदाईदतुल्ला काशिम मकानदार (वय ३२, रा.गोंधळी गल्ली चंदगड २४) प्रताप परशराम जुवेकर (वय ६०, रा. घर मं. १६८ तहसिलदार गल्ली, बेळगाव) हे युवराज कृष्णा नाईक यांच्या राहत्या घरी जुगार खेळत होते.
        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हलकर्णी येथील नाईक वस्ती येथे मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वरील सर्व आरोपी तीन पानी जुगार खेळ खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही कारवाई पोलिस अधीक्षक  डॉ. अभिनव देशमुख,, उपविभागीय पोलिस अधिकारी   डॉ.प्रशांत अमृतकर,माने, सहा.पोलीस निरीक्षक, अति.कार्यभार चंदगड पोलीस ठाणे, पो.ना. रामदास शिलेदार, पो.कॉ. अमोल देवकुळे. पी को. वैभव गवळी, पो.कॉ अनिल अष्टेकर, युवराज पाटील, विकास तांबळे,चंदगड,नेसरी पोलिस ठाणे, पोलीस मुख्यालय, कोल्हापूर व्हील क्युआरटी यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे. 

No comments:

Post a Comment