दौलत'चा गेल्यावर्षी च्या गळीत हंगामातील ५० रुपये हप्ता शेतक-यांच्या खात्यावर जमा-खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2020

दौलत'चा गेल्यावर्षी च्या गळीत हंगामातील ५० रुपये हप्ता शेतक-यांच्या खात्यावर जमा-खोराटे

दौलतचे संग्रहिच छायाचित्र
चंदगड / प्रतिनिधी
       हलकर्णी (ता. हलकर्णी) येथील दौलत साखर कारखाना संचलित अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. या कंपनीकडून गेल्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला शेवटचा प्रति  टन ५० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केल्याची माहिती अथर्व चे अध्यक्ष  मानसिंगराव खोराटे यांनी दिली.
       यावेळी बोलताना म्हणाले, ``गतवर्षीची रिकव्हरी ११.९८ इतकी होती. यामध्ये २ लाख ४४ हजार इतके गाळप झाले होते. एफ आर पी प्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना ऊस बिलाची देय रक्कम दिली आहे. या पूर्वी २७०० रुपये व आता ५०  अशी एकूण २७५० रुपये दिली आहे. अधिक दर देण्यासाठी सहविजप्रकल्प चालू करण्याचा मानस आहे,असे सांगून ते पूढे म्हणाले सन 2020-21या सालातील गळीत हंगामाची जोरात तयारी केली असून सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.``
      ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कारखाना सुरू करणार असून शेजारील कारखान्याच्या स्पर्धेत दर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खोराटे यांनी सांगितले.यावेळी संचालक पृथ्वीराज खोराटे, शेती अधिकारी धीरजकूमार माने, जी. एस. पाटील उपस्थित होते.No comments:

Post a Comment