निसर्गरम्य किटवाड धबधबा. (श्रीकांत व्ही. पाटील कालकुंद्री) |
कालकुंद्री (प्रतिनिधी)
गेल्या
दहा-पंधरा वर्षात पर्यटकांना आकर्षित करणारे किटवाड ता. चंदगड नजिकचे दोन
धबधबे व धरण परिसर अतिउत्साही पर्यटकांमुळे बदनाम होत आहे. जनावरांच्या
चराऊ व वैरणीच्या कुरणांत बिअर, दारू बाटल्या व काचांचा खच पडत आहे.
याबद्दल वाढत्या तक्रारी व कोरोनामुळे किटवाड ग्रा.पं. ने ८ तारीख पासून
दोन्ही ठिकाणे यंदा पर्यटकांसाठी बंद केली आहेत.
१९९५ शिवसेना शासनाने राबविलेली कृष्णा खोरे योजना व तत्कालीन आमदार तथा
कृष्णा खोरे योजना महामंडळ सदस्य भरमूअण्णा पाटील यांच्या प्रयत्नातून
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात कालकुंद्री व किटवाड हद्दीत दोन
लघुपाटबंधारे धरणे बांधली. या धरणांच्या सांडव्यातून ओव्हर फ्लो
पाण्यामुळे पावसाळी पर्यटकांना आकर्षित करणारे दोन धबधबे निर्माण झाले
आहेत. यात एक नंबर धरणाच्या सांडव्यात बांधलेली महाराष्ट्रातील केवळ दुसरी
नागमोडी भिंत पोहणाऱ्या पर्यटकांना अधिकच आकर्षित करते. निसर्गरम्य
परिसरामुळे गेल्या दहा-पंधरा वर्षात पावसाळी पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत
आहे. यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर बहुतांशी पर्यटनस्थळे बंद आहेत.
त्यामुळे चंदगडसह कर्नाटकातील हुक्केरी, बेळगाव तालुका व शहरातून रोज शेकडो
पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. यातील काही अतिउत्साही तरुण येताना दारू
बियरच्या बाटल्या घेऊन येतात. यात स्थानिक परिसरातील संख्याही लक्षणीय
असल्याचे समजते. हे तरुण निसर्गासोबत मद्यपानाचा आनंद लुटत असतात व
रिकाम्या बाटल्या परिसरात जनावरांच्या वैरणीसाठी राखलेल्या कुरणात फेकून
देतात. याचा मोठा त्रास शेतकरीवर्ग व मुक्या पाळीव प्राण्यांना होत आहे.
किटवाड, कालकुंद्री ग्रामपंचायतींनी अशा समाजकंटकांचा पोलीस खात्याच्या
सहकार्याने बंदोबस्त अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांतून होत आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर वाढल्यामुळे कीटवाड ग्रापं ने दोन
दिवसांपासून पर्यटकांना दोन्ही धरणे व धबधब्यांवर जाण्यास बंदी घालण्यात
घातली असून पर्यटकांनी यावर्षी इकडे येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment