बागिलगे येथे सौ. स्नेहल पाटील यांच्याकडून ग्रामस्थांना शक्तीवर्धक द्रावणाचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2020

बागिलगे येथे सौ. स्नेहल पाटील यांच्याकडून ग्रामस्थांना शक्तीवर्धक द्रावणाचे वाटप

बागिलगे येथे सौ. स्नेहल पाटील यांना ग्रामस्थाना शक्तीवर्धक द्रावणाचे वाटप केले.
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
       अवघं जग कोरोनाच्या महामारीच्या संकटाने त्रस्त झालेलं असताना जनमानसामध्ये मनोधैर्य आणि प्रतिकारशक्ती ही ग्रामीण भागातील सर्व नागरिकांमध्ये वृद्धिंगत व्हावी या हेतूने कामधेनु दूध संस्थेच्या चेअरमन तथा ग्रामपंचायत बागीलगे च्या विद्यमान सदस्य सौ स्नेहल श्रीकांत पाटील यांनी शक्तीवर्धक द्रावणाचे वाटप केले .
       सिद्धगिरी मठ कणेरी यांच्यामार्फत पुरवण्यात येणारं `शक्तीवर्धक द्रावण` सर्वांसाठी वितरीत करण्याची कल्पना सत्यात उतरवून भीतीच्या छायेखाली वावरणार्‍या प्रत्येकाला मानसिक आणि शारीरिक धैर्य देण्याचे कार्य केलेलं आहे. मेन रोड पाटील गल्ली बागीलगे येथील कुटुंबीयांना सौ. स्नेहल पाटील यांच्या वतीने या द्रावणाचे वाटप करण्यात आले. यावेळीसर्व लाभार्थींच्या वतीने सौ. स्नेहल  पाटील व श्रीकांत पाटील यांचे आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment