दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
महागांव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलचे डॉ. यशवंत, डॉ. प्रतिभा, डॉ. संजय, डॉ. सुरे खा या चव्हाण कुटुंबीयांना अविष्कार फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने "कोविड -19 समाजरक्षक" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या फाउंडेशनच्या वतीने देशभरातील 1200 हून अधिक कोरोना योध्याचा
पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. ग्रामीण भागातील सामान्य व गरीब रुग्णांना आधारवड ठरणारे या हॉस्पिटलने कोविड-19 च्या
पाश्वभुमीवर गरीब रुग्णांच्या उपचारासाठी पुढे येऊन अविरतपणे रुग्णांची सेवा केली. या त्याच्या कार्याची दखल घेत अविष्कार फाउंडेशनच्या वतीने
समाजरक्षक कोविड योद्धा पुरस्काराने गौरवण्यात आला. हॉस्पिटलला यापुर्वी
एन. ए. बी. एच. मानाकंन, स्कोच व सकाळ एक्सलन्स पुरस्कार मिळाला आहे. या
महामारीच्या काळात समाजातील गरीब व वंचित रुग्णांना मदतीचा हात दिल्याबद्दल
महागाव पंचक्रोशित चव्हाण कुटुंबियाच्या कार्याचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment