महागाव येथील संत गजाननमध्ये विद्यार्थ्यांच्या नीट परिक्षेसाठी बैठक व्यवस्था - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2020

महागाव येथील संत गजाननमध्ये विद्यार्थ्यांच्या नीट परिक्षेसाठी बैठक व्यवस्था

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
         महागांव (ता.गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहातील पॉलिटेक्निक व बी. टेक. महाविद्यालयात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नॅशनल एलिजिबिटी कम एन्ट्रांस टेस्ट (Neet) परिक्षेसाठी या केंद्रामध्ये विद्यार्थाची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
        रविवार (13 सप्टेंबर ) रोजी होणाऱ्या या परिक्षेसाठी 75 कक्षातून 900 विद्यार्थी उपस्थित राहणार आहे. शासनाच्या व नँशनल टेस्टींग एजन्सीच्या आदेशानुसार कोवीड -19 च्या पाश्वभुमीवर विद्यार्थाच्या सुरक्षित वावर राखण्याबरोबरच सर्व ती  खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच परिक्षेची सर्व तयारी झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी दिली आहे.
 
 

No comments:

Post a Comment