सापांविषयी माहिती देणारी मालिका सापांची मालिका भाग : ३४ : विषारी × बिनविषारी साप - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका सापांची मालिका भाग : ३४ : विषारी × बिनविषारी साप

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका 
सापांची मालिका भाग : ३४  : विषारी × बिनविषारी साप
                               विषारी साप × बिनविषारी साप
                               पट्टेरी मण्यार विरुद्ध कवड्या आणि कुकरी साप.
              विषारी साप समजून बिनविषारी सापांच्या हत्या नेहमी घडत असतात. (अनेक वाचकांच्या मागणीवरून मालिकेतील हा भाग आपणासमोर सादर केला जात आहे. एक सारखेच दिसणारे विषारी /बिनविषारी साप ओळखण्यासाठी सर्वांना याचा निश्चितच उपयोग होईल अशी अपेक्षा आहे.)
काही साप रंग, लांबी, शरीराची ठेवण आणि त्यांच्या अंगावरील डिझाईन वरून एक सारखेच दिसतात. आपण त्यांच्या दिसण्याचा बारकाईने अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे एक सारखेच दिसणाऱ्या सपांना ओळखण्यात आपली गल्लत होते. यातूनच विषारी साप समजून तसेच दिसणारे बिनविषारी साप हकनाक मारले जातात. अशा प्रकारचे साप आपण येत्या तीन-चार भागात पाहणार आहोत.
 यातील एकमेकाविरुद्ध असलेल्या पहिल्या जोडीत जहाल विषारी पट्टेरी मण्यार विरुद्ध बिनविषारी कवड्या आणि कुकरी या दोन सापांचा समावेश होतो. कोणताही पट्टेरी साप दिसला की आपल्या डोळ्यासमोर येतो तो जहाल विषारी पट्टेरी मण्यार आणि त्यामुळे आपण तशाच प्रकारचे दिसणारे पण बारकाईने पाहिल्यास बराच फरक असलेले बिनविषारी कवड्या आणि कुकरी या दोन सापांची नेहमी हत्या करत असतो.
 अशा घटना बहुतांशी पावसाळ्याच्या सुरुवातीस जेव्हा पावसाचे पाणी जमिनीत किंवा अशा सापांनी आसरा घेतलेल्या बिळात घुसते व ते बेघर होऊन बाहेर पडतात त्यावेळी घडते. हे टाळण्यासाठी आपण सोबतच्या छायाचित्रात दाखवलेल्या सापांचे बारकाईने निरीक्षण करा. या प्रत्येक सापाची स्वतंत्र माहिती आत्तापर्यंत झालेल्या विविध भागांमध्ये दिलेली आहे. (त्यामुळे त्याचा पुन्हा उहापोह करत नाही.) त्याची पुन्हा एकदा उजळणी केल्यास हा फरक लक्षात येईल.

फोटो 
१)विषारी -पट्टेरी मण्यार.
२)बिनविषारी -कवड्या.
३)बिनविषारी - कुकरी.


माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर


शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment