सुरुते येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ५८ हजारांच्या चोरी, गाभाऱ्याचे कुलुप तोडून सोन्याचे दागिणे लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2020

सुरुते येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ५८ हजारांच्या चोरी, गाभाऱ्याचे कुलुप तोडून सोन्याचे दागिणे लंपास

तुर्केवाडी / प्रतिनिधी
           सुरुते (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरातील मुख्य दरवाजा व गाभा-यास लावलेले कुलुपाचे कडी कोयंडे उचकटुन मंदीरात प्रवेश करुन गाभाऱ्यामध्ये असले श्री महालक्ष्मी मुर्तीचे अंगावरील वरील ५८ हजारांचे देवीचे सोन्याचे दागिणे चोरी केल्याची घटना शुक्रवारी (११ सप्टेंबर रोजी) उघड झाली असून ही घटना मंगळवार दि. ८ सप्टेंबर ते शुक्रवार ११ सप्टेंबर दरम्यान घडली आहे. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. याप्रकरणी पुजारी भावकु पुनाप्पा मगगाळे (वय ६०, सुरुते, चंदगड) यांनी चंदगड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.
           मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी शुक्रवारी नेहमीप्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिरात पुजेसाठी गेले असता त्यांना सभा मंडपातील मुख्य दरवाजाचे कुलुप कशाने तरी तोडल्याचे लक्षात आले. त्यानंतर आत प्रवेश केला असता गाभाऱ्यातील दानपेटी व शटरते कुलुप तोडल्याचे दिसून आले. तर महालक्ष्मी देवीच्या अंगावर असणारे सोन्याचे दागिने लंपास केले होते. तर त्याचे बाजुला चांदीचे दागिने आहे त्या स्थितीमध्ये ठेवलेले दिसले. त्वरीत पुजारी यांनी गावकामगार पोलीस पाटील मधुकर लक्ष्मण पाटील, तंटामुक्त अध्यक्ष नारायण भाते, शाम पाटील, उपसंरपचं शिवाजी पाटील, देवसकी पंच मारुती पाटील यांना फोनवरून संपर्क करून सर्वासमक्ष देवळातील दागिन्यांची पाहणी केली असता देवळातील दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
           दरम्यान, श्री महालक्ष्मी मंदिरातील 12 हजारांचे एक सोन्याचा एक तोळे वजनाचा लक्ष्मीहार, 7 हजारांचा एक सोन्याचा टिक्का, 12 हजारांचा पुतळी हार, 1 हजारांचे सोन्याचे मंगळसुत्र , 8 हजारांचे सोन्याचे गंठण, 9 हजरांचे एक कुडे जोडे याप्रमाणे एकुण 58 हजारांचे सोन्याचे दागिणे चोरट्याने लंपास केले आहेत.


No comments:

Post a Comment