शिनोळीच सरपंच नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विटाॅमीन सी गोळयांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2020

शिनोळीच सरपंच नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विटाॅमीन सी गोळयांचे वाटप

शिनोळीचे सरपंच नितीन पाटील विटाॅमिन सी गोळ्याचे वाटप करताना
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
          शिनोळी (ता. चंदगड) गावचे सरपंच नितीन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन विटामन सीच्या गोळ्याचे वाटप करण्यात आले. 
       सर्वत्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या चंदगड तालुक्यात जनता कर्फ्यू सुरु आहे. वाढदिवसाच कोणतेही डिजीटल बोर्ड किंवा कार्यक्रम न घेता विटामनउसीच्या गोळ्या शिनोळी गावातील नागरीकांना वाटुन कोरोनाची भिती न बाळगता धाडसाने सामोरे जाण्याविषयी पाटील यांनी जनजागृती केली. त्याचबरोबर मास्क वापरणे, सोशल डिस्टणस् पाळण्याचे आवाहण देखिल यावेळी करण्यात आले. श्री. पाटिल याच्या उपक्रमाबद्दल परीसरात त्यांचे कौतुक होत आहे.
              यावेळी उपसरपंच रघुनाथ गुडेकर, परशराम  पाटील, अमृत जती, मारुती पाटील, मोरया मेडिकलचे विनू गवसेकर, मोनेश्री चव्हाण, नामदेव सुतार, श्रीपती गुडेकर, शिवसेना विभाग प्रमुख विनोद पाटील, मारुती ताणगावडे, मारुती देवन, युवराज पाटील, शिवराज जती, प्रमोद ताणगावडे तसेच एस के ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.


No comments:

Post a Comment