कालकुंद्री नदीत नावेचे लोकार्पण, दोन वर्षाच्या मागणीची पूर्तता - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2020

कालकुंद्री नदीत नावेचे लोकार्पण, दोन वर्षाच्या मागणीची पूर्तता

कालकुंद्री- कोवाड दरम्यान ताम्रपर्णी नदी नावेचे लोकार्पण करताना विनोद पाटील आणि मान्यवर.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
          कालकुंद्री ते कोवाड दरम्यान ताम्रपर्णी नदीवर ये-जा करण्यासाठी नव्या नावेचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले. गेली दोन-तीन वर्षे जुनी नाव नादुरुस्त झाल्यामुळे नदीवरील ये-जा बंद होती. कालकुंद्री ग्रामपंचायत व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मागणीवरून आमदार राजेश पाटील यांनी जि प सदस्य अरुण सुतार यांच्या निधीतून या कामाची पूर्तता केली. 
    यामुळे कालकुंद्री, किटवाड ग्रामस्थांसह नदीच्या पलीकडे  शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. याकामी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेही सहकार्य लाभले. नाव लोकार्पण शेतकरी संघ कोल्हापूर चे संचालक विनोद पाटील यांच्या हस्ते तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष अशोक तुकाराम पाटील, मावळते सरपंच विनायक कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सलीम मोमीन, रमेश पाटील, शंकर मुर्डेकर, नारायण पाटील, मधुकर कोले, अरविंद सोनार, कल्लाप्पा बागीलगेकर,शरद जोशी, दयानंद कांबळे, विजय पाटील, सुरेश पाटील, अन्वर मुल्ला, श्रीकांत कदम, निवृत्ती तेऊरवाडकर, संजय पाटील, गजानन पाटील,भरत पाटील, ग्रामपंचायत व तंटामुक्त  कमिटीचे सर्व सदस्यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. आभार जे एस पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment