उत्साळी येथे आजरा घनसाळवर करपा, शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2020

उत्साळी येथे आजरा घनसाळवर करपा, शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान

उत्साळी (ता. चंदगड) येथे आजरा घनसाळ भातावर करपा रोग पडल्याने भातपिक असे उध्वस्थ झाले आहे.

अडकूर (सी. एल. वृत्तसेवा)

          राज्यात आजरा घनसाळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजरा घनसाळवर उत्साळी (ता. चंदगड) येथे करपा रोग पडल्याने अनिल देसाई या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

        येथील शेतकरी अनिल देसाई यानी माळशेत या दिड एकर शेतामध्ये आजरा  घनसाळ भात रोपांची लागण केली. या अगोदर या शेतात नैसर्गीक खत म्हणून तागाची लागवड करून त्याचे खत बनवले. रोप लागणवेळी १५० रुपये किलो प्रमाणे आजरा घनसाळ या भाताच्या वाणाची लागण केली. भाताची योग्य काळजी घेतल्याने भात चांगल्या प्रकारे वाढले. पण वातावरणातील बदलामुळे व जोरदार पावसाच्या माऱ्याने करपा रोग पडल्याने संपूर्ण भातच भूईसपाट झाले आहे. या शेतात आता मुठभर भात तर सोडाच पण मुठभर गवतही मिळणे अवघड झाले आहे. हजारो रुपये खर्च करून आपल्या पोटच्या पोराप्रमाणे काळची घेतलेले आजरा घनसाळसारखे भात उध्वस्थ झाल्याने या शेतकऱ्याने करायचे तरी काय ? शासनाने याचाही पंचनामा करणे गरजेचे आहे. अशा शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देणे महत्वाचे आहे.

No comments:

Post a Comment