सुंडी येथे सीआरपीएफचे जवान संजय कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार, आमदार पाटील, डीवायएसपी इंगळे यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2020

सुंडी येथे सीआरपीएफचे जवान संजय कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार, आमदार पाटील, डीवायएसपी इंगळे यांची उपस्थिती

सुंडी येथे आमदार राजेश पाटील वीर जवान संजय कांबळे यांना पुष्पचक्र अर्पण करताना.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

         सीआरपीएफचे जवान संजय परसु कांबळे (वय 45, सुंडी, ता. चंदगड) यांचे तेलंगणा येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराने निधन झाले. वीर जवान संजय कांबळे अमर रहे, अमर रहे, वंदे मातरम्, अशा घोषणा देत देश भक्तीपर गीते लावून अंत्ययात्रा काढली. त्यांच्यावर सुंडी येथे शनिवारी (दि. २४) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

        संजय यांचे पुतणे प्रशांत यांनी त्यांना भडाग्नी दिला. यावेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील, तहसीलदार विनोद रणावरे, पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक यांच्यासह सीआरपीएफचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण केले.

        संजय हे केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ)  हवालदार म्हणून कार्यरत होते. 1994 साली सांगली येथे भरती झाले होते. त्यांचे शुक्रवारी दि. २३ रोजी भद्राचलम (तेलंगणा) येथे सेवा बजावत असताना दुपारी १२ वाजता हृदयविकाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. सध्या ते हिंडलगा, मांजरेकर कॉलनी, नवीन वसाहत येथे राहत होते. गारगोटी प्रांत कार्यालयातील कर्मचारी सोमाना कांबळे यांचे ते लहान बंधू होते.

No comments:

Post a Comment