लाकुरवाडीचे सरपंच प्रकाश निट्टूरकर यांचे निधन, पाटणे फाटा बंद पाळून दुखवटा - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2020

लाकुरवाडीचे सरपंच प्रकाश निट्टूरकर यांचे निधन, पाटणे फाटा बंद पाळून दुखवटा

प्रकाश ईश्वर निटूरकर

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

लाकुरवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश ईश्वर निटूरकर (वय 45) यांचे अल्पशा आजाराने रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने पाटणे फाटा परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोमवारी दिवसभर पाटणे फाटा व्यापारी मित्र मंडळाने एक दिवस बंद पाळून दुखवटा जाहीर केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. ते लाकुरवाडीचे असले तरी गेली वीस वर्षांहून अधिक तावरेवाडी येथील रहिवासी आहेत. परिसरातील एक समाजप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ते प्रसिद्ध होते. तावरेवाडी येथे २० वर्षापासून कृष्णा ऑईल आणि राईस मिल सुरू करून मोठी विश्वासार्हता निर्माण केली होती. गत दोन वर्षापासून हलकर्णी एमआयडीसी येथे बालाजी राईस मिल यामाध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाची वेगळी ओळख करून दिली होती. अडलेल्या- नडलेल्याना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. ते पाटणे फाटा व्यापारी मित्र मंडळाचे पदाधिकारी होते. त्यांच्या जाण्याने व्यापारी मित्र मंडळाने सोमवारी दिवसभर सर्व व्यापार बंद ठेवून एक दिवस दुखवटा जाहीर केला आहे.

No comments:

Post a Comment