![]() |
गोपाळ कृष्णा रेडेकर |
चंदगड / प्रतिनिधी
कुदनूर (ता.चंदगड) येथील गोपाळ कृष्णा रेडेकर (वय ६०) हे नदीकाठावरील गवत कापत असताना पाय घसरून ताम्रपर्णी नदीत पडल्याने नदीतील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
शनिवारी दि.२४ ऑक्टोबर रोजी शेताकडे गवत आणण्यासाठी गेले असता परत न आल्याने दोन दिवस शोधमोहीम सुरू होती. पण सोमवार दि.२६ ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान कामेवाडी बंधाऱ्याशेजारी त्यांचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. या घटनेचा तपास कोवाडचे सहाय्यक फौजदार हणमंत नाईक करत आहेत.
No comments:
Post a Comment