चंदगड येथे गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2020

चंदगड येथे गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड येथे अंजूमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट व चंदगड मुस्लिम समाज यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार २९/१०/२०२० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

      कोरोना काळात रक्ताची कमतरता लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हजरत मुहम्मद पैगंबर (सल्ल.) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारसारणीला अनुसरून महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक अरूण थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तजमूल फनीबंद यानी दिली. रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन मुस्लिम समाजाचे अध्यक्ष गफार शेरखान यांनी केले आहे.No comments:

Post a Comment