कानूर खुर्द येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गॅस सिलेंडरचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2020

कानूर खुर्द येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गॅस सिलेंडरचे वाटप

आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोफत गॅसचे वितरण करताना वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षेइंडेन गॅस एजन्सी मालक प्रविण वाटंगी, तानाजी गडकरी आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         मौजे कानूर खुर्द (ता. चंदगड) येथे डॉ . शामप्रसाद मुखर्जी जन वन विकास अंतर्गत आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते ५७ नविन लाभार्थी ना मोफत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले . यावेळी चंदगड चे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, कानूरचे वनपाल ए. डी. वाजे, चंदगड वेणुगोपाल एजस्नीचे मालक प्रविण वाटंगी आदी मान्यवर उपस्थित होते.

          यावेळी बोलताना वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे  म्हणाले, ``या योजनेचा मुख्य भाग हा वनावरील ताण कमी करणे हा आहे . तसेच वनतोड थांबून मानव व वन्य प्राणी यांचा संघर्ष कमी करण्यासाठी हा उपक्रम आहे . या योजनेत २५ % रक्कम ही लाभार्थी कडून घेऊन ७५ % रक्कम शासनाने  दिली आहे . यानंतर सर्व लाभार्थीना दोन गॅस टॉक्या ,लाईट र , शेगडी , पाईप व रेग्यूलेटर देण्यात आले . तसेच वर्षभरात १२ वेळा या टॉक्या भरून देण्यात येणार आहेत . त्यामूळे शेतकरी इंधन गोळा करण्यासाठी वनात जायचा थांबेल आणि शेतकरी व जंगली प्राणी संघर्ष कमी होईल .

 आमदार राजेश पाटील म्हणाले , शासनाची खूप छान योजना आहे . या योजनेचा लाभ पात्र लाभार्थी वर्गाने घ्यावा . या योजनेमुळे वन संवर्धनाला गती मिळणार आहे . शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त योजना सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचवणार असल्याचे सांगून वन्यप्राणि  व शेतकरी संघर्ष कमी करण्यासाठी विविध अपाययोजना राबवणार असल्याचे आमदार पाटील यानी सांगितले. यावेळी सरपंच , उपसरपंच , ग्रामस्थ , वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment