बँक ऑफ महाराष्ट्र अडकुर शाखा अधिकाऱ्यांना निवेदन देताना राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी. |
चंदगड / प्रतिनिधी
मराठा बेरोजगार युवकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून स्वयंरोजगार साठी राष्ट्रीयीकृत बँकेतर्फे १० ते ५० लाख कर्ज देण्यात येते. तथापि चंदगड तालुक्यातील मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना या लाभापासून वंचित ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. अशा मागणी केलेल्या गरजू तरुणांना बँक ऑफ महाराष्ट्र अडकूर शाखेतून मागणीनुसार कर्ज निधी कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता तात्काळ देण्यात यावा या मागणीचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सेक्रेटरी सुरेश दळवी यांनी दिले.
महामंडळाच्या या कर्जाच्या मागणीसाठी येणाऱ्या मराठा समाजातील बेरोजगाराना शाखेतून कर्ज देण्यात यावे. मंजुरीनंतर या कर्जाचे व्याज महामंडळ भरते असे काँग्रेसचे प्रदेश सेक्रेटरी दळवी यांनी शाखा अधिकारी यांना सांगितले. आज दुपारी बँक ऑफ महाराष्ट्र अडकुर शाखेतून मराठा समाजाच्या युवकांना बिना तारण कर्ज देण्यात यावे. याबाबतचे निवेदन देताना सुरेश दळवी यांच्यासह गणेश दळवी, शिवराज देसाई, अनंत भोसले, राजेंद्र दळवी, श्रीकांत देसाई, नितीन दळवी आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment