तहसिल कार्यालयातील बैठकीत संजय गांधी योजनेच्या नुतन पदाधिकारी सत्कार करताना आमदार राजेश पाटील, शेजारी तहसिलदार विनोद रणवरे. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील पात्र लाभार्थ्याना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देताना राजकारण न करता अनुदान पोहचवण्यासाठी प्रशासनासह समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले. चंदगड तहसिल कार्यालयात आयोजित संजय गांधी निराधार योजनेची आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी नूतन अध्यक्ष व सदस्यांचा चंदगड तहसील कार्यालयात सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविक संजय राजगोळे यांनी केले.
आमदार पाटील म्हणाले, ``या योजनेतील लाभार्थ्यांची तालुक्यातील आकडेवारी पहिली तर चांदगडमध्ये इतर तालुके व जिल्ह्याच्या तुलनेत खूपच कमी काम झालेलं आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिक लोकभिमाख होत माणुसकीच्या दृष्टीने विचार करून काम करण्याची गरज आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना व्हावा यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याची तरतूद करावी, जेणेकरून नागरिकांना त्वरित अनुदान मिळेल, अशा सूचनाही यावेळी आमदार पाटील यांनी केल्या.``
No comments:
Post a Comment