विंझणे (ता. चंदगड) येथील श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकरी पतसंस्थेत एप्रिल २०१६ ते मार्च २०१८ या कालावधीत तब्बल ४८ लाख ६३ हजारांचा अपहार झाल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात उपलेखा परीक्षक तानाजी रायप्पा खंनदाळे (रा. महागाव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मॅनेजर, चेअरमन, संचालकांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उत्तम विठोबा चव्हाण, दत्तु संतु कांबळे, आनंदीबाई पांडूरंग मेंगाने, बंडू कृष्णा बाघवे, आप्पा गोपाळ बाघवे, आनंदा लक्ष्मण चव्हाण, आप्पा बाबु पडवळे, दत्तु आप्पा पवार, केशव रामचंद्र निकम, शंकर यशवंत पवार , अशोक बाबु आमृसकर (सर्व रा.विंझने ता.चंदगड, जि. कोल्हापुर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था विझंणे (ता.चंदगड जि.कोल्हापुर) या संस्थेतील कर्जदारानी परतफेड केलेल्या कर्जाची रक्कम, आनामत रक्कम, सेव्हींग ठेव रक्कम, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आडकुर येथे भरणा न केलेली रक्कम, पंतसंस्थेकडील रोख शिल्लक रक्कम अशी एकुन ४८ लाख ६३ हजार ०२५ रुपये रक्कमेचा मॅनेजर यांनी अपहार केला असलेचे दि.१३/०३/२०१९ ते २९ /०६/२०१९ चे लेखा परीक्षण तपासणी वेळी दिसुन आले आहे. तसेच चेअरमन दत्तु संतु कांबळे, व्हाईस चेअरमन सौ.आनंदीबाई पांडूरंग मैंगाने यांच्यासह संचालकांनी संस्थेचे अपहार व गैरव्यवहाराकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन मनेजर यास सहकार्य केले तसेच संस्थेतील सभासद, कर्जदार, ठेवीदार यांची खोटे हिशोब तयार करुन फसवणुक केली. त्यामुळे पतसंस्थेचे मॅनेजर, चेअरमन व संचालक मंडळातील सदस्य यांचे विरुध्द सरकार तर्फे फिर्यादी यांनी भा.द.वि.स कलम ४२०, ४०६, ४६७, ४७७अ, ३४ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे.अधिक तपास पोहेकाॅ जाधव करत आहेत.
No comments:
Post a Comment