कोवाड पोलिस चौकीचे पोलिस नाईक संतोष साबळे यांचा बदलीनिमित्त सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2020

कोवाड पोलिस चौकीचे पोलिस नाईक संतोष साबळे यांचा बदलीनिमित्त सत्कार

कोवाड पोलिस चौकीचे पोलिस नाईक संतोष साबळे यांचा बदलीनिमित्त जि. प. सदस्य कलाप्पा भोगण यांच्या हस्ते सत्कार झाला. 

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कोवाड पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस नाईक संतोष साबळे यांचा बदली निमित्त नागरिकांच्या वतीने जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळी. 

        प्रारंभी हवालदार मानसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक  केले. जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी संतोष साबळे यांच्या सहा वर्षातील कामाचा अनुभव व किणी कर्यात भागात साबळे यांनी नागरिकांमध्ये मिळून मिसळून केलेल्या कामामुळे त्याची जनमानसात चांगली प्रतिमा तयार झाली आहे. कामाच्या रूपाने ते सर्वांच्या लक्षात राहतील. सरकारी नोकरीत बदली ही ठरलेली असते, साबळे यांनी वरच्या पदावर बढती घेऊन पून्हा चंदगड तालुक्यात यावे, येथील नागरिक त्यांचे स्वागत करतील अशा शुभेच्छा दिल्या.

    सहाय्यक फौजदार हणमंत नाईक यांनी गेल्या सहा वर्षांत संतोष साबळे यांनी आपल्या गोड स्वभावामुळे कोवाड परिसरात आपला एक चांगला मित्र परिवार निर्माण केला आहे. पोलीस दलात काम करताना त्यांनी आपल्या आदरयुक्त बोलण्यातुन लहान थोरांनाही आपलंस केल होतं, त्यांची आठवण सदैव कोवाडकरांना येत राहील. यावेळी पोलीस मित्रांच्यावतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी सत्काराला उत्तर देताना संतोष साबळे यांनी चंदगड तालुक्यात काम करताना नागरिकांनी दिलेले प्रेम नेहमीच लक्षात राहील. असे सांगून कोवाड परिसरातील नागरिकांनी केलेला सत्कार आयुष्यात उर्जा देणारा असेल असे सांगितले. 

            याप्रसंगी पोलीस कॉन्टेंबल कुशाल शिंदे, अमर सायेकर, स्वाभीमानी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी भोगण, दिपक वांद्रे, राम मनवाडकर, मुनीर मुल्ला, लक्ष्मण मनवाडकर, रमेश जाधव, होमगार्ड कल्लाप्पा कोळींद्रे, ईराप्पा कोळींद्रे, प्रमोद भास्कळ, ईराप्पा नाईक, डाॅ. मारुती भोगण, रामा कांबळे आदीसह नागरिक उपस्थित होते.

                                


  


No comments:

Post a Comment