आरोग्यसंपन्न जीवनासाठी फिटनेस ही काळाची गरज - संगीता घाटगे, कुदनूर येथे दादा फिटनेस सेंटरचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2020

आरोग्यसंपन्न जीवनासाठी फिटनेस ही काळाची गरज - संगीता घाटगे, कुदनूर येथे दादा फिटनेस सेंटरचे उद्घाटन

परिसरातील नागरिकांना आरोग्यवर्धक राहण्यासाठी होणार मदत

दादा फिटनेस सेंटर चे उदघाटन करताना शटूलाबाई घाटगे,संगीता घाटगे,सुरेश घाटगे व इतर मान्यवर

कोवाड सी एल वृत्तसेवा

ग्रामीण भागातील मुलांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी एक सदृढ युवक वर्ग घडावा या उद्देशाने कुदनूर येथील दादा डेव्हलपर चे मालक सुरेश घाटगे यांच्या पुढाकाराने कुदनूर येथे सुरू होत असलेल्या दादा फिटनेस सेंटर चे उदघाटन त्यांच्या मातोश्री शटुलाबाई मारुती घाटगे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी संगीता घाटगे म्हणाल्या कि, आजवर शहरी भागामध्ये अनेक फिटनेस सेंटर ची सुविधा उपलद्ध असून ग्रामीण भागातील मुलांना आवड असून सुद्धा यापासून वंचित राहावे लागते.त्यामुळे ग्रामीण भागातील युवक वर्गामध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि फिटनेस सेंटर जवळच्या जवळ उपलब्ध व्हावे या एकाच उद्देशाने आजपासून सदर फिटनेस सेंटर सर्वांसाठी खुले करत आहोत.

या फिटनेस सेंटर मध्ये बेंचप्रेस,डबेल्स,लैटरल पुली,व्हर्टिजल लेगप्रेस,ट्रेडमिल मशीन,स्कॉटिंग बार,बायसेक मशीन,चेस्ट बेंच,इ अत्याधुनिक मशिन्स सह प्रशिक्षित ट्रेनर द्वारे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.तरी सर्वांनी या सुविधांचा लाभ घेऊन आपले आरोग्य जपण्याचे आवाहन यावेळी सुरेश घाटगे यांनी केले आहे.

यावेळी अमोल घाटगे,चंद्रकांत कांबळे, मायापा पाटील,अविनाश हुद्दार,डॉ राहुल पवार, हणमंत मोहनगेकर,उस्ताद सर,सागर हेब्बाळकर,विजय कोले,राजू पवार,सुरेश वांद्रे,गुंडू तेली,तानाजी खनदाळे,राजाराम मोहन गेकर, संदेश जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment